Tuesday, May 23, 2006

आम्‍लेट

कोंबडीच्‍या अंड्यामधून बाहेर आलं पिल्‍लू ;
अगदी होतं छोटं
आणि उंचीलाही टिल्‍लू !
कोंबडी म्‍ह्‍णाली," पिल्‍लू बाय,
सांग तुला हवे काय ?
किडे हवे तर किडे,
दाणे हवे तर दाणे ;
आणून देईन तुला
हवे असेल ते खाणे !
पिल्‍लू म्‍ह्‍णाले," आई,
दुसरे नको काही
छोट्याशा कपामध्‍ये चहा भरुन दे ,
मला एका अंड्याचे आम्‍लेट करुन दे !
- मंगेश पाडगावकर .
'ति' सावली

संधीप्रकाशात अलग होतानाती उदास पणे म्हणाली
वाटले मीच तुला साथ करत असेन
पण उमजले आता, साथ तुला
माझ्यापेक्षा `ति'चीच ज्यास्त
असताना अस्तित्वाने आनं
नसताना आठवणींनी
रोमा रोमाला, क्षणा क्षणाला!!!
....दिलीप
चारोळ्या


तुझ्याविना....
तुझ्याविना माझी सगळी
वस्तीच बकाळ झाली..
विचार करता करता
न कळत सकाळ झाली..

प्रतिक्षा....
मरण तर कधी ना कधी येणारच आहे...
पण तु ही येशील असा विश्वास आहे !
फक्त कोण आधी येणार ते पहायचे आहे...
तसा आता माझा तुटतो श्वास आहे !!

वेडी आसवे....
तुझ्या घरावरून जाताना
हल्ली तिकडे नजर वळत नाही...
मनाचे ठीक आहे ग
पण आसवांना काहीच कळत नाही.........

पाण्याचा एक थेंब..

पाण्याचा एक थेंब...
तो जर तव्यावर पडला तर त्याच
आस्तित्वचं संपत,
तो जर कमळाच्या पानावर पडला तर....
मोत्यासारखा चमकतो.
आणी जर शिंपल्यात पडला तर...
मोतीच होतो.
पाण्याचा थेंब तोच...
फरक फक्त सहवासाचा !!!!!!!!!

Friday, May 05, 2006


कणा

About Me

My photo
अमरावती - पुणे, महाराष्ट्र, India
इथे तुम्हाला मराठी माणसाच्या जीवणातील विनोद, प्रेम, स्वभाव, राग, आनंद, द्वेष आणि अशी अनेक रुपे कवितेच्या माध्यमातून वाचायला मिळतील. या इंटरनेट आणि इंग्रजीच्या युगात आपली माय-मराठी व तिचे साहित्य कुठे मागे पडायला नको, त्याच्या साठीच हा एक प्रयत्न...
ह्या विभागात वापरण्यात आलेल्या साहित्याचे सर्व हक्क त्या-त्या प्रकाशकाचे किंवा साहित्यकाराचेच. आणि हो कविता आवडल्यास तुमच्या प्रतिक्रीया लिहायला विसरु नका.

Chat with me

Local Time

Live Traffic Feed