जग, तू नव्या उमेदीने राखेतून जगण्यासाठी उठल्याप्रमाणे, बघ प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीकोणातून. श्रावण असेल तर हिरवळीवर मनसोक्त लोळ अन् शिशिरात पिकलं पान पडलं तर त्याला सोन्याप्रमाणे तोल. भेटला झरा सुखाचा तर समजून हा जिवनातील आनंद पण, झाला दगा आयुष्यात तर घे तो ही अनुभव आयुष्याचा. प्रत्येक क्षण वेचून हो अमृत म्हणून आयुष्य जगतांना फक्त नावालाच जिवंत राहू नकोस. वाईट गोष्टी, अनुभव लवकर विसरून जा. चांगल्या गोष्टी, अनुभव नेहमीच लक्षात ठेव कारण तेच भावी आयुष्यातील स्फुर्तीच उगमस्थान असेल, कोणी तुझं वाईट केलचं तर त्याचा राग द्वेष मनात कधीच ठेवू नकोस कारण द्वेषापेक्षा प्रेम करणे सोपं असतं तेव्हा त्यांच्यावरही प्रेमच कर कारण प्रेमानेच प्रेम वाढतं, कारण प्रेमासाठी आयुष्य कमी पडतं, तेव्हा कधीही प्रेमान भरलं मन तोडू नकोस कारण त्या मनामध्ये देव राहात असतो असं म्हणतात.
झालास यशस्वी जीवनात तर त्याचा आनंद घेतल्याशिवाय राहू नये पण आलं अपयश तर निराशही होऊ नकोस. मी सांगणार नाही तुला अपयश ही यशाची पहिली पायरी असते वगैरे. पण एवढं मात्र नक्की अपयश म्हणजे संपूर्ण जीवन नसते, लागतच नसेल कशात मन तर वाचून हो सुरुवातीला अपयशी झालेल्या यशस्वी व्यक्तींच्या कारकिर्दिची पुस्तक, मानते मी त्यातील सर्वच काही खरं नसते. पण त्यातील अपयशाकडून यशाकडे जाण्याचे मनोधैर्य तेवढं घ्यायचं असते, कर प्रेम सर्वांवर चांगल्यावर वाईटवर, वाईट लोकांवर जरा जास्तच कर कारण त्यांनाच खरं तर प्रेमाची आवश्यकता असते. आयुष्यात काहीच मिळालं नाही म्हणून कधी दुःख करू नकोस कारण ज्या गोष्टी मिळविण्यासाठी लोकांना आयुष्य घालवावे लागते त्या कदाचित आपल्याला जन्मताच न मागता मिळाल्या असतात तेव्हा त्यांचा उपभोग घे.
स्वतःला नशीबवान म्हणूनच जगात वावर कारण जो स्वतःला नशिबवान समजते तोच व्यक्ती आयुष्यात समोर जातो. नशीबात जे असतं ते घडते हे खरं पण सर्वच नशीबावर न सोडता त्याला मेहनतीची साथ दे. या जगात काहीच अशक्य नाही जे घडून गेले त्यावर कधी खंत व्यक्त करू नकोस त्यापेक्षा जे पुढे होणार आहे त्यावर लक्ष केंद्रीत कर.
स्वतःला मोठं दाखविण्याकरिता दुसर्या व्यक्तीस कमी माननेच आवश्यक नाही स्वतःमध्ये असे गुण बाळग की ज्यामुळे स्वतःच्या व इतरांच्या नजरेत मोठा होशील तुझ्याजवळ स्वाभिमान असू दे पण अभिमान मात्र कधी होऊ देऊ नको. कारण स्वाभीमान आणि अभिमान फार थोडेच अंतर आहे याच अंतराला तूला नेहमी कायम ठेवायचे आहे.
Thursday, June 11, 2009
Wednesday, June 10, 2009
डिव्होर्स हवाय !!!
दारावरची बेल वाजते. एक तरुण पुरुष दार उघडतो... तरुण स्त्री अत्यंत वैतागून आत येते. दार लावून घेते. तो परत जे काम करत असतो त्यात गर्क होतो. ती बसून राहते , थोडा वेळ शांतता.
...
ती : मला डिव्होर्स हवाय....
तो : काय झालं ?
ती : आताच्या आता.... ताबडतोब मला डिव्होर्स दे.
तो : पण का ?
ती : मग तरी निदान - डिव्होर्सच्या धक्क्यातून सावरायला मी कुठेतरी लांब जाऊ शकेन गम भूलाने के लिये... कुठल्यातरी अभयारण्यात एकटी फिरेन. ना ही गर्दी असेल ना ट्रॅफिक जॅम. तुला माहितीये , चर्चगेट टू अंधेरी फास्ट ट्रेनने बरोबर ३५ मिनिटांत पोहोचले पण अंधेरी टू घर , दीड तास. इतका ट्रॅफिक जॅम होता की मी बसमधून उतरले नि चालू लागले. रस्ते पण इतके घाण झालेत आणि... आणि सतत कुठून तरी कोणी तरी थुंकत असतं. स्वत:ला बचावत कशीबशी पुढे आले , रिक्षा केली तर रिक्षावाल्यानेही फसवलं. सगळे फसवतात रे आपल्याला. आपण टीव्ही नाही घेतला , आपल्याकडे गिझर नाही तरी इलेक्ट्रिकचं बिल भरभसाट , मोबाइलवर पण कामापुरतं बोलूनही भयानक बिल. ते वाचलंस ना दुधात भेसळ , भाज्यांना केमिकल्स लावून हिरवं करणं - मला राग येतोय. त्यात आपली लिफ्ट बंद होती. मेण्टेनन्स कशासाठी भरायचा मग... मला डिव्होर्स दे किंवा दूर कुठेतरी घेऊन चल , कंटाळा आलाय - रोज तेच तेच...
तो : चल आताच्या आत निघू जी ट्रेन मिळेल त्यात बसू जिथे वाटेल तिथे उतरू कोणाहीकडे राहू दोन दिवस मुक्काम परत खांद्यावर शिदोरी घेऊन पुढे जाऊ रात्रभर तारे बघू , शेतात फिरू , उन्हात रापू , दिवसभर समुद्रकिनारी पहुडून राहू...चल.
ती : खरंच जाता आलं असतं तर किती बरं झालं असतं - असंच असावं ना आयुष्य.
तो : आर यू शुअर तिथे गेल्यावर गावात फिरताना कुठल्या शेतकऱ्याच्या आत्महत्येबद्दल आपल्या कानावर येणारच नाही ? समुद्रातही किती प्रदूषण वाढलंय दिसणारच नाही आपल्याला - म्हणजे आपण अगदी ठरवलं तर कदाचित नाही कळणार. आपल्याला सगळे सेन्सेज बंद करायची सवय तर लागलीच आहे म्हणा...
ती : बघू तू परत मला निराश करतोयस. मला माहितीये सगळं वास्तव भयाण आहे. पण एखादी वा-याची झुळूक कावळा , चिमणी , कबूतराव्यतिरिक्त एखादा पक्षी दिसणं ? जाऊ देत काहीच शक्य नाही - आणि रोजची पैसा मिळवून देणारी कामं सोडून जायची धमकही नाहीये रे - उद्या माझं प्रपोजल सँक्शन होईल का ? आज बॉस खुश झाला - बास्स एवढंच आयुष्य... म्हणून मला एखाद्या मोठ्या धक्क्याची गरज आहे - दे ना रे डिव्होर्स मला किंवा एखादं अफेअर कर...
तो : चहा घेतेस ? नाही मस्त लिंबू सरबत करतो तुझ्यासाठी - फ्रेश वाटेल. मग बोलू अफेअरबद्दल...
( ती हसते - हळूच त्याला मिठी मारते)
ती : चल परत पळून जाऊ या... (दोघं मिठीत)
तो : उद्या बघू...

प्रेमात पडावंसं प्रत्येकाला वाटतं
प्रेमात पडावंसं प्रत्येकाला वाटतं, वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळ्या पद्धतीने लोक प्रेमात पडतात. कधी अनेक वर्षं ओळख असते आणि अचानक जाणवतं, अरे यार, आपण प्रेम करतोय याच्यावर! तर कधी कधी अगदी पहिल्या भेटीतच तारा जुळतात...
मला असं वाटतं, की प्रत्येक पिढीची प्रेम व्यक्त करण्याची एक स्टाइल असते. ती जुन्या पिढीसारखी असू नये याबाबत आपण एकदम अलर्ट असतो. तरुणाईतली ती कदाचित पहिली बंडखोरी असते. भर उन्हात रस्त्यातून हात पकडून चालणं असो, की सीसीडीमध्ये टाइमपास करत बसणं असो, त्याला किंवा तिला अनेक एसएमएस लिहून खोडणं असो, की त्याच्या किंवा तिच्या नावाचे इनिशियल्स वहीत गिरवणं असो, शॉपिंग मॉलमध्ये काहीही न घेता फिरत राहणं असो की, लेक्चर चालू असताना एकमेकांना मिसकॉल देणं असो... आपल्याला आपल्या पद्धतीने सेलिब्रेट करायचं असतं आपलं प्रेम...
कॉलेजच्या कट्ट्यावरचे दिवस संपले की प्रेम संपून जात नसतं. ते आपल्याला विविध वळणांवर थोडं अधिक मॅच्युअर होऊन भेटत असतं. कधी कॉलसेण्टरच्या खिडकीतून कोणी पाच मिनिटं काढून आभाळाकडे बघत बसतं आणि जाणवतं याच्याशी होऊ शकेल आपली मैत्री, कधी रस्त्यावर आपली जुनी गर्लफ्रेण्ड भेटते आणि तिच्याशी गप्पा मारल्यावर अजूनही आपण एकमेकांचे चांगले मित्र आहोत याचं समाधान मिळतं. कधी रेस्तराँमध्ये बसल्यावर समोरच्या टेबलवर बसलेलं स्वत:मध्येच रममाण असणारं कपल दिसतं, तर कधी थकून घरी आल्यावर नवऱ्याने स्वयंपाक करून ठेवलेला असतो. आपल्या रोजच्या रुटीनमध्ये असे प्रेमाचे क्षण अनेकदा येत असतात, फक्त आपण कधी कधी त्या क्षणांना महत्त्वच देत नाही. ते येतात अन् जातात. त्यांचे आपल्याला भूलवणं चालूच असतं. आपण कामाच्या आणि गदीर्च्या व्यापात विसरून जातो. लोकलमध्ये चढल्यावर ती गाडी दिसेनाशी होईपर्यंत कुणी आपल्यासाठी हात हलवत होतं, हे कळतच नाही. ऑफिसच्या डेली मेल्जमध्ये रोज हायकूची मेल येते, ती कोण करतं आपण बघायचेही कष्ट घेत नाही. गर्लफ्रेण्डसाठी नवीन टी-शर्ट घेताना आपल्याला लक्षातही नसतं तिला कोणता रंग आवडतो... त्याच्या रुटीनची आपल्याला इतकी माहिती होऊन जाते की, कधी सरप्राइज द्यायला तो लवकर आला तर आपल्याला वाटतं मीटिंग कॅन्सल झाली असेल.
मग हे क्षण घरंगळतात, आपल्यावर रुसतात, त्यांना ठोकताळ्यात बसवलं म्हणून अबोला धरतात आणि हळूहळू हरवून जातात. प्रेमाला नाही आवडत बांधलेपणा किंवा चौकट. त्याला त्याच्या पद्धतीने फुलायचं असतं, उमलायचं असतं. एक गुलाबाचं लाल फुल देऊन प्रपोज करण्यापेक्षा साधं सरळ अडखळत विचारणं त्याला आवडतं, दर फ्रायडेला गर्लफ्रेण्डला घेऊन पबमध्ये जाण्यापेक्षा अचानक कधीतरी लाँग ड्राइव्हवर जाणं आवडतं, पिक्चरपेक्षा शांत बसून गप्पा मारलेल्या आवडतात. शॉपिंगपेक्षा शेअरिंग आवडतं, हक्कापेक्षा मोकळीक आवडते आणि मला वाटतं, की हे प्रेमाचे क्षण आपण नेहमी हरवून बसतो ना म्हणूनच Valentine day चा जन्म झाला असेल... आपल्याला ही जाणीव करून द्यायला की, पुढचं वर्ष तरी आपण प्रेमाचे हे अनमोल क्षण मिस करू नयेत...

Tuesday, June 09, 2009
नाही वाचता गं आला
नाही वाचता गं आला
तुझ्या मनातलं तुझ्या
नाही ओठावर येतं
तुझ्या मनातलं सारं
तुझे डोळे सांगतात।
तुझे डोळे सांगतात
तुला म्हणायचं काय
अनवाणी फिरतात
तुझे तुझ्या दारी पाय
तुझे तुझ्या दारी पाय
कसे वाटतात फुलं
तुला पाहूनिया सखे।
मला पडते गं भूलं
मला पडते गं भूल
आता सांगू तरी कुणा
कशा टाळू सांग सखे
तुझ्या नजरेच्या खुणा
तुझ्या नजरेच्या खुणा
माझ्या काळजाच्या आत
त्याच काळजाचा केला
तूच अचानक घात
तूच अचानक घात
केला असा कसा व्यर्थ
नाही वाचता गं आला
तुझ्या डोळ्यातून अर्थ
गणेश एस.भाकरे
नागपूर
तुझ्या मनातलं तुझ्या
नाही ओठावर येतं
तुझ्या मनातलं सारं
तुझे डोळे सांगतात।
तुझे डोळे सांगतात
तुला म्हणायचं काय
अनवाणी फिरतात
तुझे तुझ्या दारी पाय
तुझे तुझ्या दारी पाय
कसे वाटतात फुलं
तुला पाहूनिया सखे।
मला पडते गं भूलं
मला पडते गं भूल
आता सांगू तरी कुणा
कशा टाळू सांग सखे
तुझ्या नजरेच्या खुणा
तुझ्या नजरेच्या खुणा
माझ्या काळजाच्या आत
त्याच काळजाचा केला
तूच अचानक घात
तूच अचानक घात
केला असा कसा व्यर्थ
नाही वाचता गं आला
तुझ्या डोळ्यातून अर्थ
गणेश एस.भाकरे
नागपूर
माझ्या कवितेच्या वहीत
माझ्या कवितेच्या वहीत
रंगा गंधांची उधळण
काळोखाच्या पानोपानी
शुभ्र चांदण्याची पखरण...
माझ्या कवितेच्या वहीत
अर्थ शब्दांचे उलगडे
कधी हरवलेला चेहरा
माझा मलाच सापडे...
माझ्या कवितेच्या वहीत
माझे जगण्याचे बळ
वाळवंटी वाटेवर जणू
गर्द सावलीचे स्थळ
माझ्या कवितेच्या वहीत
अजून असे बरेच काही
जे शब्दापल्याडचे
शब्दात मावत नाही...
संदीप वाकोडे
सिरसो विभाग
मूर्तिजापूर, जि. अकोला
रंगा गंधांची उधळण
काळोखाच्या पानोपानी
शुभ्र चांदण्याची पखरण...
माझ्या कवितेच्या वहीत
अर्थ शब्दांचे उलगडे
कधी हरवलेला चेहरा
माझा मलाच सापडे...
माझ्या कवितेच्या वहीत
माझे जगण्याचे बळ
वाळवंटी वाटेवर जणू
गर्द सावलीचे स्थळ
माझ्या कवितेच्या वहीत
अजून असे बरेच काही
जे शब्दापल्याडचे
शब्दात मावत नाही...
संदीप वाकोडे
सिरसो विभाग
मूर्तिजापूर, जि. अकोला
Subscribe to:
Posts (Atom)