Saturday, May 09, 2009

तोच क्षण होतो

काही क्षण जगणे जगवतात
तर काही क्षण जगणे संपवतात
या जीवन मृत्यूच्या क्षणांतला
एक क्षण मात्र आगळा-वेगळा
आतुर असतो फुलायला
तुझ्या माझ्यातल्या दुव्यातला
तोच क्षण होतो मग, पाकळी-पाकळी
ना गळणे, ना कळी कळी!
हाच क्षण ओवाळतो आदी अंताला
तुझ्या माझ्यातल्या निरांजनाला
तोच क्षण होतो, सूर्य कोटी-कोटी
ना विझणे, ना रश्मी!
हाच क्षण बरसतो अवनी अवनी
तुझ्या माझ्यातली अंकुर रोवणी
तोच क्षण होतो, अवघी सृष्टी सृष्टी
ना पानगळ, ना पालवी-पालवी!
हाच क्षण झुलतो, जन्मो-जन्मी
तुझ्या माझ्यातले मनो-मीलन
तोच क्षण होतो, पुन्हा सप्तपदी
ना निरगांठ, ना अग्नी-अग्नी!
क्षण हाच तो, पुन्हा झेपावता अंतरिक्षी
तुझ्या माझ्यातल्या नभांगणी
तोच क्षण होतो, मन गगन-गगन
ना तारांगण ना क्षितिज मीलन-मीलन!

-राज मेहर
नागपूर

About Me

My photo
अमरावती - पुणे, महाराष्ट्र, India
इथे तुम्हाला मराठी माणसाच्या जीवणातील विनोद, प्रेम, स्वभाव, राग, आनंद, द्वेष आणि अशी अनेक रुपे कवितेच्या माध्यमातून वाचायला मिळतील. या इंटरनेट आणि इंग्रजीच्या युगात आपली माय-मराठी व तिचे साहित्य कुठे मागे पडायला नको, त्याच्या साठीच हा एक प्रयत्न...
ह्या विभागात वापरण्यात आलेल्या साहित्याचे सर्व हक्क त्या-त्या प्रकाशकाचे किंवा साहित्यकाराचेच. आणि हो कविता आवडल्यास तुमच्या प्रतिक्रीया लिहायला विसरु नका.

Chat with me

Local Time

Live Traffic Feed