Friday, June 30, 2006

मैत्रीण


एक तरी मैत्रीण असावी
बाईकवर मागे बसावी
जुनी हीरो होंडा सुद्धा मग
करिझ्माहून झकास दिसावी !

एक तरी मैत्रीण असावी
चारचौघीत उठून दिसावी
बोलली नाही तरी निदान
समोर बघून गोड हसावी !

एक तरी मैत्रीण असावी
कधीतरी सोबत फिरावी
दोघांना एकत्र पाहून
गल्लीतल्या सगळ्या पोरांची जिरावी !

एक तरी मैत्रीण असावी
जिच्याशी निर्मळ संवाद असावा
कधीतरी छोट्या भांडणाचा
एखादाच अपवाद असावा..

एक तरी मैत्रीण असावी
आयुष्याच्या अनोळखी वळणावर
तुमच्या व्यथा वेदनांवर
तिने घालावी हळूच फुंकर..

एक तरी मैत्रीण असावी
जिच्या मैत्रीत विश्वास रुजावा
तुमचासुद्धा खांदा कधी
तिच्या दुःखाने भिजावा..

एक तरी मैत्रीण असावी
चांदणीसारखी मैत्रीच्या आकाशात
मित्रांचे दिवे मावळले म्हणजे
चालावं पुढे तिच्याच प्रकाशात...

Wednesday, June 21, 2006

आठवणं

आठवून पाहायचो मी काही पावसाळे
तिच्या-माझ्या संगतीत भिजलेले
हवेभोवती गंध घेवून
रानोमाळ पसरलेले. . .

आठवायचा अवचीत मग तो नदीकाठ
कमळ फुलांनी बहरलेला
चांदणीची वाट पाहत मग
तो चंद्र रात्र जागलेला. . .

जाणवायची नकळत मग ती बोचरी थंडी
गुलाबी स्वप्नातून जागवणारी
नुसतीच मग एक निरर्थक धडपड
अपूर्णततेही पूर्णत्व शोधणारी. . .

आठवून यायची, तीची सारी वचने
अशीच कुठेशी मोडून पडलेली
प्रतिसादांना शोधणारी तीची प्रत्येक हाक
नियतीने माझ्यापासून दूर लोटलेली. . .

दाटलेलं धुकं मग सावकाश पाझरायचं
ओल्या होवून जायच्या तिच्या सगळया "आठवणी"
एखाद-दुसरां मग त्या चुकार थेंबानी
उगीचचं भरुन यायची माझी गोठलेली "पापणी"

Wednesday, June 14, 2006

सांग ना !

आज अचानक भल्या पहाटे
एक आठवण जागवून गेली
तुझे आणि माझे बंध
आपसूकच दाखवून गेली

सांग ना !
काय तुझे आणि माझे नाते
उमजेल का, कधी मला ते

करून करून विचार जेव्हा
कधी नव्हे ते थकलो
गालांवरचा पाऊस मी
थांबवू नाही शकलो

मॆत्रीचे हे नाते अपुले
का आज एकतर्फी वाटले
पहाटेच्या या ऒल्या शणी
का कातरवेळ्चे ध्यास लागले

का तुझ्या डोळ्यात आज
शोधतोय मी पाऊस गाणे
धुक्याच्या या ओंजळीमध्ये
प्रेमरूपी दव थेंब माझे

सापडेल का या शणांना
कधी एक गोड किनारा
गालांवरच्या पावसाला
सावरणारा एक जिव्हाळा
सावरणारा एक जिव्हाळा

Monday, June 12, 2006

बघ माझी आठवण येते का? (Remix)

ऑफिसच्या खिडकित उभी राहून पहा.
बघ माझी आठवण येते का
हात लांबव तळहातावर घे पिसीचे कीबोर्ड.
इवलासा मेल वाचून बघ
बघ माझी आठवण येते का...


वाऱ्याने उडनारे फाईल मधले पेपर्स सांभाळुन ठेव.
डोळे मिटुन घे,तल्लीन हो.
नाहीच आठवल काही तर मेल चेक कर.
इनबॉक्स वर ये, तो भरलेला असेलच.
मग वाचू लाग.
माझे कंटाळवाणे फ़ॉरवर्ड वाचुन घे.
वाचत राहा मेल संपेपर्यंत.
तो संपनार नाहीच.

शेवटी मेल बंद कर.डिलीट करु नकोस.
फ़ॉरवर्ड करु नकोस.
पुन्हा त्याच इनबॉक्स वर ये.
आता दुसऱ्या मेलची वाट बघ.
बघ माझी आठवण येते का....

Thursday, June 08, 2006

कुणीतरी हव असतं...

कुणीतरी हव असतं,जीवनात साथ देनार
हातात हात घेउन, शब्दान्शिवाय बोलनार्...
कुणीतरी हव असतं,जीवाला जीव देनार

फ़ुलातल्या सुगन्धासारख,आयुष्यभर जपनार्...
कुणीतरी हव असतं,हक्कान् रागावनार,

चुका ज़ाल्या तरी,मायेन समज़ावनार...
कुणीतरी हव असतं,आपल म्हननार

नजरेतले भाव जानुन,आपल्याला ओळखणार...
कुणीतरी हव असतं,बरोबर चालणार,

कशीही वाट असली तरी,माग न फ़िरनार...
कुणीतरी हव असतं,वास्तवाच भान देणार,

कल्पनेच्या विश्वातही,माझ्यासवे रमणार...
कुणीतरी हव असतं,मनापासुन धीर देणार,

स्वतहाच्या दुखातही,मला सामाउन घेणार...
कुणीतरी हव असतं,एकान्तातही रेन्गाळनार,

माझ्यासोबत नसतानाही,मझ्यासोबतच असनार...
कुणीतरी हव असतं,विश्वास ठेवणार,

माझ्या विश्वासाला.कधीही न फ़सवणार...
कुणीतरी हव असतं,मला समजुन् घेनार,

आयुष्याच्या वाटेवर साथ देशील क विचारणार...

Friday, June 02, 2006

बरेचदा असेच व्हायचे...

बरेचदा असेच व्हायचे
भेटण्याचे ठिकाण ठरायचे
वेळसुद्धा निश्‍चित व्हायची
कधी-कधी दिली वेळ
मावळून जायची पण,
येतो म्हणून तुझे मात्र
कधीच येणे नसायचे

मग कधीतरी असेच अचानक
रस्त्यावरती भेटणे व्हायचे
हसून-बोलून मग,
मागचे रुसवे हवेत
सारे विरून जायचे

पुन्हा पुढच्या भेटीसाठी
एक वेगळे ठिकाण ठरायचे
वेळ मात्र तिच असायची
दिली वेळ तशीच मावळून जायची
तुझे मात्र येणे नसायचे
अन्‌ माझ्याकडे "प्रतीक्षे'शिवाय
बाकी दुसरे काहीच नसायचे

Thursday, June 01, 2006

पहिल्या पावसाच्या पहिल्याच शुभेच्छा...

थंड हवा, ढगाळ आकाश,
धुक्यात डोंगर आणि मातीचा सुवास,
गरमागरम भजी, कडक चहा,
चिंब भिजायला तयार रहा,
पहिल्या पावसाच्या पहिल्याच शुभेच्छा...!.

About Me

My photo
अमरावती - पुणे, महाराष्ट्र, India
इथे तुम्हाला मराठी माणसाच्या जीवणातील विनोद, प्रेम, स्वभाव, राग, आनंद, द्वेष आणि अशी अनेक रुपे कवितेच्या माध्यमातून वाचायला मिळतील. या इंटरनेट आणि इंग्रजीच्या युगात आपली माय-मराठी व तिचे साहित्य कुठे मागे पडायला नको, त्याच्या साठीच हा एक प्रयत्न...
ह्या विभागात वापरण्यात आलेल्या साहित्याचे सर्व हक्क त्या-त्या प्रकाशकाचे किंवा साहित्यकाराचेच. आणि हो कविता आवडल्यास तुमच्या प्रतिक्रीया लिहायला विसरु नका.

Chat with me

Local Time

Live Traffic Feed