बरेचदा असेच व्हायचे...
बरेचदा असेच व्हायचे
भेटण्याचे ठिकाण ठरायचे
वेळसुद्धा निश्चित व्हायची
कधी-कधी दिली वेळ
मावळून जायची पण,
येतो म्हणून तुझे मात्र
कधीच येणे नसायचे
मग कधीतरी असेच अचानक
रस्त्यावरती भेटणे व्हायचे
हसून-बोलून मग,
मागचे रुसवे हवेत
सारे विरून जायचे
पुन्हा पुढच्या भेटीसाठी
एक वेगळे ठिकाण ठरायचे
वेळ मात्र तिच असायची
दिली वेळ तशीच मावळून जायची
तुझे मात्र येणे नसायचे
अन् माझ्याकडे "प्रतीक्षे'शिवाय
बाकी दुसरे काहीच नसायचे
Subscribe to:
Post Comments (Atom)
5 comments:
krupaya tumchya blog varil kavita koNi lihilya aahet te dekhil lihit ja.
tya baryach thikaNavarun aalelyaa aahet he kaLate aahe.
माझ्या वाचनात आलेल्या चांगल्या कविता रसिक वाचकांपर्यंत पोहचवायचं मी फक्त छोटसं काम करतो. हेतु असा की, नवीन कवीच्या कविता लोकांपर्यंत गेल्या पाहिजे. कवीची ऒळख जगाला झाली पाहिजे. कविच्या प्रतिभाशक्तीला आपण सर्व कविता प्रेमींनी दाद द्यायची. कवितेचे सर्व हक्क त्या त्या कवीचेच. मला जर कवीचं नाव माहित असेल तर मी ते कविता पोस्ट करताना लिहायला कधीच विसरत नाही आणि तुम्ही पण विसरु नका.
thik ahe. naav nahit nasel tar 'poet unknown' ase lihave.
chaanglya kavita aahet keep it up
Are zakas..
Kay page banavles..
Shailesh Gawande
daraypur
sdgawande@yahoo.co.in
Post a Comment