Saturday, November 25, 2006

मराठी मुलगी


company मधे अनेक mod मुली असतात,
पण जी गोड लाजते,
ती मुलगी मराठी असते.

company मध्ये मुली short top घालतात.
पण जी पाठ दिसू नये म्हणून top खाली ओढते,
ती मुलगी मराठी असते.

company मध्ये मुली jeans घलुन येतात,
पण जि jeans बरोबर पायात पैजण घालते,
ती मुलगी मराठी असते.

कंपनीमधे अनेक मुली असतात
पण वात्रटपणा केल्यावए कानाखाली वाजवते
ती मुलगी मराठी असते

कॉलेजमधे अनेक मुली असतात
स्वतःच्या नोट्स सहज दुसरयाला देते
ती मुलगी मराठी असते

शॉपींगलाही अनेक मुली जातात
खर्चाचा विचार करुन फ़क्त कानातलं घेऊन येते
ती मुलगी मराठी असते

Tuesday, October 31, 2006

पन असे समझु नकोस की......


डोळे माझे शा॑त आहेत.
व्यवहारी जीवनाला फ़ितुर आहे.
पन असे समझु नकोस की,
ते कधी पाणावलेच नाही.

आकाश माझे निरभ्र आहे.
चा॑दण्या॑चीही स॑गत आहे.
पन असे समझु नकोस की ते
कधी ढगाळलेच नाही.

काटे माझ्या रस्त्यात आहेत
ती सबध पसरली आहेत.
पन असे समझु नकोस की
माझ्या आयुष्यात कधी गुलाब
उमललेच नाही.

शब्द् माझे निशःब्द् आहेत.
झाडासारखे मुके आहेत.
पन असे समझु नकोस की
ते कधी बोललेच नाही.

आर्त स्वराचे गाने आहे.
भुतकाळात मन जाते आहे.
पन असे समझु नकोस की
हे सगळ तुझ्यासाठी मनाच कुढन आहे.....

Wednesday, August 30, 2006

हवीस तू


स्वप्नातील गोड भास
सत्यातील आस तू
हवीस तू.... हवीस तू

मोहक तू लडीवाळ
मिश्कील आणि खट्याळ
बोल तुझे किती मधाळ
सत्य असून स्वप्न तू
हवीस तू...हवीस तू

गझल तूच नटलेली
सूरात चिंब भिजलेली
हृदयातील श्वासांची
सूरेल एक तान तू
हवीस तू... हवीस तू

स्पर्श तुझा लाजरा
श्वास तुझा मोगरा
पाहूनी तुझ्या अदा
कूस बदलती ऋतू
हवीस तू... हवीस तू

Wednesday, July 19, 2006

करुन बघ


ज़न्माला आली आहेस
थोडं जगून बघ ,
जीवनात दु:ख खूप आहे ,
थोडं सोसून बघ !
चिमुट्भर दु:खाने कोसळू नकोस ,
दु:खाचे पहाड चडून बघ !
यशाची चव चाखून बघ ,
अपयश येत, निरखून बघ ,
डाव मांडणं सोपं असतं ,
थोडं खेळून बघ !
घरटं बांधणं सोपं असतं ,
थोडी मेहनत करुन बघ !
जगणं कठीण असतं , मरणं सोपं असतं ,
दोन्हीतल्या वेदना झेलून बघ !
ज़ीणं - मरणं एक कोडं असतं ,
जाता - जाता एवढं सोडवून बघ !

Friday, July 14, 2006

कधीतरी वाटतं यार


ह्या खांद्यावर डोकं ठेवून
तिला रडावसं वाटावं
काँलेजनंतर मागे थांबून
सोबत बसावसं वाटावं

ज्या स्वप्नांमधे माझ्या
सगळ्या रात्री जागतात
त्या स्वप्नांमधे हरवून
तिलाही जागावसं वाटावं

माझे आसू पुसून तिनं
आमच्या सुखात हसावं
कधीतरी वाटतं यार,
आपलंही कुणीतरी असावं!


छोट्या छोट्या गोष्टींमधे
खोटं खोटं चिडावं
पण, भेटीनंतर निघते म्हणताना
तिचं पाऊल अडावं

बाकी सगळ्या जगाचा
पडेलच विसर तेव्हा
तिनं माझ्या प्रेमात
अगदी आकंठ बुडावं

ह्या छोट्याश्या स्वप्नानं
एकदाच खरं व्हावं
नेहमीच वाटतं यार,
आपलंही कुणी असावं!

Monday, July 10, 2006

यात काही पाप नाही


मोठी E-मेल वाचुन
तुम्ही जेव्हा हसता
आणि अगदि तातडीने
Reply टाकायला बसता
विश्वास ठेवा यात काही पाप नाही .
Office चे resourses न वापरने
या सारखा दुसरा शाप
नाही.

जबरदस्त डुलकि येते
Project specifications वाचतांना
Boss धुरकट दिसु लागतो
Meeting मध्ये असतांना
तिथल्या तिथे तुम्ही पेंगु लागता
विश्वास ठेवा यात काही पाप नाही .
Meeting पूर्ण वेळ attend करायला लागणे
या सारखा दुसरा शाप
नाही.

Codding, Testing, debuging टाळुन
तुम्ही messenger चालु करता
Documentation करायचे सोडुन
तुम्ही फक्त chatting करता
विश्वास ठेवा
यात काही पाप नाही .
documentation करायला लागने
या सारखा दुसरा शाप
नाही.


Salary अजुन झाली नाही म्हणून
तुम्ही componyla शिव्या घालता
काम करायचे सोडुन तुम्ही
या विषयावर चर्चा करता
विश्वास ठेवा
यात काही पाप नाही .
एवढे काम करुन salary न मिळणे
या सारखा दुसरा शाप
नाही.

Friday, June 30, 2006

मैत्रीण


एक तरी मैत्रीण असावी
बाईकवर मागे बसावी
जुनी हीरो होंडा सुद्धा मग
करिझ्माहून झकास दिसावी !

एक तरी मैत्रीण असावी
चारचौघीत उठून दिसावी
बोलली नाही तरी निदान
समोर बघून गोड हसावी !

एक तरी मैत्रीण असावी
कधीतरी सोबत फिरावी
दोघांना एकत्र पाहून
गल्लीतल्या सगळ्या पोरांची जिरावी !

एक तरी मैत्रीण असावी
जिच्याशी निर्मळ संवाद असावा
कधीतरी छोट्या भांडणाचा
एखादाच अपवाद असावा..

एक तरी मैत्रीण असावी
आयुष्याच्या अनोळखी वळणावर
तुमच्या व्यथा वेदनांवर
तिने घालावी हळूच फुंकर..

एक तरी मैत्रीण असावी
जिच्या मैत्रीत विश्वास रुजावा
तुमचासुद्धा खांदा कधी
तिच्या दुःखाने भिजावा..

एक तरी मैत्रीण असावी
चांदणीसारखी मैत्रीच्या आकाशात
मित्रांचे दिवे मावळले म्हणजे
चालावं पुढे तिच्याच प्रकाशात...

Wednesday, June 21, 2006

आठवणं

आठवून पाहायचो मी काही पावसाळे
तिच्या-माझ्या संगतीत भिजलेले
हवेभोवती गंध घेवून
रानोमाळ पसरलेले. . .

आठवायचा अवचीत मग तो नदीकाठ
कमळ फुलांनी बहरलेला
चांदणीची वाट पाहत मग
तो चंद्र रात्र जागलेला. . .

जाणवायची नकळत मग ती बोचरी थंडी
गुलाबी स्वप्नातून जागवणारी
नुसतीच मग एक निरर्थक धडपड
अपूर्णततेही पूर्णत्व शोधणारी. . .

आठवून यायची, तीची सारी वचने
अशीच कुठेशी मोडून पडलेली
प्रतिसादांना शोधणारी तीची प्रत्येक हाक
नियतीने माझ्यापासून दूर लोटलेली. . .

दाटलेलं धुकं मग सावकाश पाझरायचं
ओल्या होवून जायच्या तिच्या सगळया "आठवणी"
एखाद-दुसरां मग त्या चुकार थेंबानी
उगीचचं भरुन यायची माझी गोठलेली "पापणी"

Wednesday, June 14, 2006

सांग ना !

आज अचानक भल्या पहाटे
एक आठवण जागवून गेली
तुझे आणि माझे बंध
आपसूकच दाखवून गेली

सांग ना !
काय तुझे आणि माझे नाते
उमजेल का, कधी मला ते

करून करून विचार जेव्हा
कधी नव्हे ते थकलो
गालांवरचा पाऊस मी
थांबवू नाही शकलो

मॆत्रीचे हे नाते अपुले
का आज एकतर्फी वाटले
पहाटेच्या या ऒल्या शणी
का कातरवेळ्चे ध्यास लागले

का तुझ्या डोळ्यात आज
शोधतोय मी पाऊस गाणे
धुक्याच्या या ओंजळीमध्ये
प्रेमरूपी दव थेंब माझे

सापडेल का या शणांना
कधी एक गोड किनारा
गालांवरच्या पावसाला
सावरणारा एक जिव्हाळा
सावरणारा एक जिव्हाळा

Monday, June 12, 2006

बघ माझी आठवण येते का? (Remix)

ऑफिसच्या खिडकित उभी राहून पहा.
बघ माझी आठवण येते का
हात लांबव तळहातावर घे पिसीचे कीबोर्ड.
इवलासा मेल वाचून बघ
बघ माझी आठवण येते का...


वाऱ्याने उडनारे फाईल मधले पेपर्स सांभाळुन ठेव.
डोळे मिटुन घे,तल्लीन हो.
नाहीच आठवल काही तर मेल चेक कर.
इनबॉक्स वर ये, तो भरलेला असेलच.
मग वाचू लाग.
माझे कंटाळवाणे फ़ॉरवर्ड वाचुन घे.
वाचत राहा मेल संपेपर्यंत.
तो संपनार नाहीच.

शेवटी मेल बंद कर.डिलीट करु नकोस.
फ़ॉरवर्ड करु नकोस.
पुन्हा त्याच इनबॉक्स वर ये.
आता दुसऱ्या मेलची वाट बघ.
बघ माझी आठवण येते का....

Thursday, June 08, 2006

कुणीतरी हव असतं...

कुणीतरी हव असतं,जीवनात साथ देनार
हातात हात घेउन, शब्दान्शिवाय बोलनार्...
कुणीतरी हव असतं,जीवाला जीव देनार

फ़ुलातल्या सुगन्धासारख,आयुष्यभर जपनार्...
कुणीतरी हव असतं,हक्कान् रागावनार,

चुका ज़ाल्या तरी,मायेन समज़ावनार...
कुणीतरी हव असतं,आपल म्हननार

नजरेतले भाव जानुन,आपल्याला ओळखणार...
कुणीतरी हव असतं,बरोबर चालणार,

कशीही वाट असली तरी,माग न फ़िरनार...
कुणीतरी हव असतं,वास्तवाच भान देणार,

कल्पनेच्या विश्वातही,माझ्यासवे रमणार...
कुणीतरी हव असतं,मनापासुन धीर देणार,

स्वतहाच्या दुखातही,मला सामाउन घेणार...
कुणीतरी हव असतं,एकान्तातही रेन्गाळनार,

माझ्यासोबत नसतानाही,मझ्यासोबतच असनार...
कुणीतरी हव असतं,विश्वास ठेवणार,

माझ्या विश्वासाला.कधीही न फ़सवणार...
कुणीतरी हव असतं,मला समजुन् घेनार,

आयुष्याच्या वाटेवर साथ देशील क विचारणार...

Friday, June 02, 2006

बरेचदा असेच व्हायचे...

बरेचदा असेच व्हायचे
भेटण्याचे ठिकाण ठरायचे
वेळसुद्धा निश्‍चित व्हायची
कधी-कधी दिली वेळ
मावळून जायची पण,
येतो म्हणून तुझे मात्र
कधीच येणे नसायचे

मग कधीतरी असेच अचानक
रस्त्यावरती भेटणे व्हायचे
हसून-बोलून मग,
मागचे रुसवे हवेत
सारे विरून जायचे

पुन्हा पुढच्या भेटीसाठी
एक वेगळे ठिकाण ठरायचे
वेळ मात्र तिच असायची
दिली वेळ तशीच मावळून जायची
तुझे मात्र येणे नसायचे
अन्‌ माझ्याकडे "प्रतीक्षे'शिवाय
बाकी दुसरे काहीच नसायचे

Thursday, June 01, 2006

पहिल्या पावसाच्या पहिल्याच शुभेच्छा...

थंड हवा, ढगाळ आकाश,
धुक्यात डोंगर आणि मातीचा सुवास,
गरमागरम भजी, कडक चहा,
चिंब भिजायला तयार रहा,
पहिल्या पावसाच्या पहिल्याच शुभेच्छा...!.

Wednesday, May 31, 2006

बघ माझी आठवण येते का?

मुसळधार पाऊस खिडकीत उभं राहून पहा
बघ माझी आठवण येते का?
हात लांबव, तळहातांवर झेल पावसाचं पाणी
इवलसं तळं पिऊन टाक
बघ माझी आठवण येते का?
वार्‍याने उडणारे पावसाचे थेंब चेहर्‍यावर घे
डोळे मिटून घे, तल्लीन हो
नाहिच जाणवलं काही तर बाहेर पड, समुद्रावर ये
तो उधाणलेला असेलच, पाण्यात पाय बुडवून उभी रहा
वाळू सरकेल पायाखाली, बघ माझी आठवण येते का?
मग चालू लाग, पावसाच्या अगणित सुया टोचून घे
चालत रहा पाऊस थांबेपर्यत, तो थांबणार नाहिच, शेवटी घरी ये
साडी बदलू नकोस, केस पुसू नकोस, पुन्हा त्याच खिडकीत ये
आता नवर्‍याची वाट बघ, बघ माझी आठवण येते का?
दारावर बेल वाजेल, दार उघड, नवरा असेल
त्याच्या हातातली बॅग घे, रेनकोट तो स्वतःच काढ़ेल
तो विचारेल तूला तुझ्या भिजण्याचं कारण, तू म्हणं घर गळतयं
मग चहा कर, तूही घे
तो उठून पंकज उधास लावेल, तो तू बंद कर
शरीराकडे बघ
बघ माझी आठवण येते का?
यानंतर सताड डोळ्यांनी छप्पर पहायला विसरू नकोस
यानंतर बाहेरचा पाऊस नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर
यानंतर उशीखाली सुरी घे, झोपी जाण्याकिशोरीचं सहेलारे लाव, बघ माझी आठवण येते का?
मग रात्र होईल तो तुला कुशीत घेईल, म्हणेल तू मला आवडतेस
पण तुही तसचं म्हणं
विजांचा कडकडात होईल, ढ़गांचा गडगडाट होईल
तो त्या कुशीवर वळेल, त्याच्या पाठमोर्‍या चा प्रयत्न कर
येत्या पावसाळ्यात एक दिवसतरी, बघ माझी आठवण येते का?

....गारवा
पहिला पाऊस

पहिला पाऊस पहिली आठवण
पहिलं घरटं पहिलं अंगण
पहिली माती पहिला गंध
पहिलं आभाळ पहिलं रान
पहिल्या झोळीत पहिलच पान
पहिले तळहाथ पहिलं प्रेम
पहिल्या सरीचा पहिलाच थेंब
पहिला पाऊस पहिलीच आठवण
पहिल्या घराचं पहिलच अंगण
....गारवा

Monday, May 29, 2006

फ़क्त एकदाच

फ़क्त एकदाच तुला मनसोक्त हसताना पाहायचयं
निदान त्यासाठी तरी मला विदुषक बनून तुझ्यासमोर यायचयं

फ़क्त एकदाच तुझ्या मनातलं सारं काही जाणून घ्यायचयं
निदान त्यासाठी तरी नजरेला नजर भिडवून तासनतास बसायचयं

फ़क्त एकदाच तुझ्या मऊशार केसांतून हळूवार हात फ़िरवायचायं
निदान त्यासाठी तरी एखादा गजरा तुझ्या केसांत घालायचायं

फ़क्त एकदाच तुला माझ्यासाठी बेचैन होताना पाहायचयं
निदान त्यासाठी तरी ठरलेल्या वेळेपेक्षा थोडं ऊशिरा यायचयं

फ़क्त एकदाच तुला अनिवार रडताना पाहायचयं
निदान त्यासाठी तरी मला खोटंखोटं मरायचयं......

Tuesday, May 23, 2006

पाहुणे

काहो, नवरदेवाला कोणी मित्र नाहीत वाटतं? जेवढे लोकं आली सगळे नोर्मल आहेत... (कोणी घेतलेली दिसत नाहि म्हणुनं विचारलं)
आम्‍लेट

कोंबडीच्‍या अंड्यामधून बाहेर आलं पिल्‍लू ;
अगदी होतं छोटं
आणि उंचीलाही टिल्‍लू !
कोंबडी म्‍ह्‍णाली," पिल्‍लू बाय,
सांग तुला हवे काय ?
किडे हवे तर किडे,
दाणे हवे तर दाणे ;
आणून देईन तुला
हवे असेल ते खाणे !
पिल्‍लू म्‍ह्‍णाले," आई,
दुसरे नको काही
छोट्याशा कपामध्‍ये चहा भरुन दे ,
मला एका अंड्याचे आम्‍लेट करुन दे !
- मंगेश पाडगावकर .
'ति' सावली

संधीप्रकाशात अलग होतानाती उदास पणे म्हणाली
वाटले मीच तुला साथ करत असेन
पण उमजले आता, साथ तुला
माझ्यापेक्षा `ति'चीच ज्यास्त
असताना अस्तित्वाने आनं
नसताना आठवणींनी
रोमा रोमाला, क्षणा क्षणाला!!!
....दिलीप
चारोळ्या


तुझ्याविना....
तुझ्याविना माझी सगळी
वस्तीच बकाळ झाली..
विचार करता करता
न कळत सकाळ झाली..

प्रतिक्षा....
मरण तर कधी ना कधी येणारच आहे...
पण तु ही येशील असा विश्वास आहे !
फक्त कोण आधी येणार ते पहायचे आहे...
तसा आता माझा तुटतो श्वास आहे !!

वेडी आसवे....
तुझ्या घरावरून जाताना
हल्ली तिकडे नजर वळत नाही...
मनाचे ठीक आहे ग
पण आसवांना काहीच कळत नाही.........

पाण्याचा एक थेंब..

पाण्याचा एक थेंब...
तो जर तव्यावर पडला तर त्याच
आस्तित्वचं संपत,
तो जर कमळाच्या पानावर पडला तर....
मोत्यासारखा चमकतो.
आणी जर शिंपल्यात पडला तर...
मोतीच होतो.
पाण्याचा थेंब तोच...
फरक फक्त सहवासाचा !!!!!!!!!

Friday, May 05, 2006


कणा

Thursday, April 27, 2006

पुणेरी शब्द                                                                                    

पुणेरी शब्द
केशव
साधा सरळ माणुस, नाका समोर बघून चालणारा.
सामान
त्याची प्रेयसी.
काटा काकु
चांगली दिसणारी पण वयाने ज्यास्त.
खडकी
एकदम टुकार.
झक्कास
एकदम चांगले.
काशी होणे
गोची होणे.
लई वेळा
नक्की, खात्रीने.
चल हवा येवू दे
निघून जा.
मस्त रे कांबळे
छान, शाब्बास.
पडीक
बेकार.
मंदार
मंद बुध्दीचा.
चालू
शहाणा.
पोपट होणे
फजिती होणे.
दत्तू.
एखाद्याचा हुज~या.
बॅटरी
चश्मेवाला / चश्मेवाली.
पुडी
माणिकचंद व दुसरा गुटखा.
राष्ट्रगीत वाजणे
संपणे / बंद पडणे.
पुडी सोडणे
थाप मारणे.
खंबा
दारुची / बीयरची बाटली.
पावट्या
एकदम मुर्ख.
खडकी दापोडी
हलक्या प्रतीचे.
टिणपाट
काहीच कामाचा नसलेला.
पेताड / बेवडा
खुप दारु पिणारा.
डोलकर
दारु पिवून झिंगणारा.
सावरकर
दारु पिवून झिंगणा-याला सावरणारा.
वखार युनूस
दारु पिवून ओकारी करणारा.
सोपान
गांवढंळ माणुस.
श्यामची आई.
लैंगीक सिनेमा.
सांडणे
पडणे.
जिवात जिव येणे
गरोदर रहाणे.
पाट्या टाकणे
रोज तेच तेच काम करुन वेळ घालवणे.
भागवत
दुस-याच्या जिवावर जगणारा.
पत्ता कट होणे
शर्यतीतुन बाहेर होणे.
फणस लावणे
नाही त्या शंका काढणे.
फिरंगी
कोकाटे इंग्लीश फाडणारा.
पेटला
रागावला.
बसायचे का?
दारु प्यायची का?
चड्डी
एखाद्याच्या खुप जवळचा.
हुकलेला
वाया गेलेला.
डोळस
चष्मेवाला/ली.
यंत्रणा
जाड मुलगी.
दांडी यात्रा
ऑफीसला बुट्टी मारणे/खाडा.
चैतन्य कांडी
सिगारेट/बिडी.
चैतन्य चुर्ण
तंबाखु.
चेपणे
पोटभरुन खाणे.
कल्ला
मज्जा.
सदाशिव पेठी
कंजुष.
बुंगाट
अती वेगाने.
टांगा पल्टी
दारुच्या नशेत `आउट' झालेला.
थुक्का लावणे
गंडवणे.
एल एल टी टी
तिरळा. लुकिंग लंडन टॉकिंग टोकियो.
घ्या श्रीफळ
जा आता घरी.
कर्नल थापा
थापाड्या.
सत्संग
ओली पार्टी.

Tounge twister



काकाने काकुला कपाटात कोंडले कारण
काकुने काकाच्या कपाटातले कामाचे कागद कात्रीने कराकरा कापुन काढले.

मदन, मोहन, मालविय मद्रास में मछली मारते मारते मरे.

नंदु के नाना ने नंदु कि नानी को नल के निचे नंगा नहलाया.

चार कचरी कच्चे चाचा,चार कचरी पक्के.पक्की कचरी कच्चे चाचा,कच्ची कचरी पक्के!

खडक सिंग के खडकाने से खडकती हैं खिडकियां, खिडकियों के खडकने से खडकता है खडक सिंग.

जो हंसेगा वो फसेगाजो फसेगा वो हंसेगा.

मर हम भी गये, मरहम के लिये, मरहम ना मिला. हम दम से गये, हमदम के लिये, हमदम ना मिला

दुबे दुबई में डूब गया

तोला राम ताला तोल के तेल में तुल गयातुला हुआ तोला ताले के तले हुए तेल में तल गया

नज़र नज़र मे हर एक नाराज मे हमे उस नज़र कि तलाश थी !वो नाराजर मिली तो सही पर उस नज़र मे अब वो नज़र कहां थी.

प्रेमकथा
सगळ्या प्रेमकथांची सुरुवात
गोड बोलण्यानंच होते
सगळ्या प्रेमकथांची अखेर
मटार सोलण्यानंच होते!
प्रेमात दोघं असतात तेंव्हा
सगळं गुलाबी वाटत असतं
एकमेकांना प्रेमानं दिलेलं
पाणीही शराबी वाटत असतं
प्रेमकथांची सुरुवात अशीच
पाण्यानंही झिंगून जाण्यानं होते
प्रेमकथांची अखेर मात्र
(तळमजल्यावरून) बादल्या भरून आणण्यानं होते!
प्रेमाचा डाव रंगतो तेंव्हा
'हात' एकमेकांसाठी धरले असतात
दोघंजणं एकमेकांसाठीराजा-राणी बनले असतात
प्रेमकथांची सुरुवात अशीच
एकमेकांसाठी 'हात' धरण्यानं होते
प्रेमकथांची अखेर मात्र
एकमेकांना झब्बू देण्यानं होते!
प्रेमामधे एकमेकांबद्दल
जे जे काही कळलं असतं
संसारात त्याच गोष्टींवरून
एकमेकांना छळलं जातं
प्रेमकथांची सुरुवात अशीच
कळूनही न कळण्यानं होते
प्रेमकथांची अखेर मात्र
छळून छळून छळण्यानं होते!
एकमेकांच्या वागण्यामधे
आपल्याला फक्त चुका दिसतात
एकमेकांच्या शब्दांमधे
चाबूक आणि बंदुका दिसतात
जे जे होणार नाही वाटतं
ते ते सारं घडत जातं
प्रेमकथेच्या शेवटी शेवटी
सारं सारं बिघडत जातं!

Saturday, March 04, 2006

प्रेम असो अभिमान नसो
माणूस स्वतःला जात, धर्म, भाषा, देश, पक्ष, यावर आधारित ज्या गटाचा समजतो त्याचा तो अभिमान बाळगतो. त्यांत त्याचा उद्देश आपल्या गटाला त्यांतील काही असामान्य व्यक्तींमुळे जे मोठेपण मिळालेले असते त्या मोठेपणावर हक्क सांगण्याचा असतो. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर मोठे होण्यासाठी स्वतः काही न करता फुकटांत मोठेपणा मिळविण्याचा हा प्रयत्न असतो. मात्र आपल्या गैरवर्तणुकीमुळे आपल्या गटाला कमीपणा येण्याची शक्यता आहे ही गोष्ट त्याच्या लक्षांत येत नाही.

याउलट माणूस आपल्या गटावर प्रेम करू लागेल तर आपल्यामुळे आपल्या गटाला मोठेपणा कसा प्राप्त होईल याचा तो विचार करील व त्याप्रमाणे कृती करील. आपल्या वर्तणुकीमुळे आपल्या गटाला कमीपणा येणार नाही याचीही तो काळजी घेईल. त्यांत त्याचा स्वतःचा विकास होईल, त्याला गटातच नव्हे तर गटाबाहेरही मान्यता मिळेल व गटाच्या मोठेपणांत भरही पडेल ज्यांतून गटांतील होतकरूंना प्रेरणा मिळेल.

तेव्हा स्वतःची जात, धर्म, भाषा, देश, पक्ष, विसरण्याची गरज नाही. फक्त आपल्या गटाचा अभिमान न बाळगता त्याच्यावर प्रेम करा.

पहा पटतंय का!

Monday, February 13, 2006

मराठी प्रोग्रॅमिंग भाषा
माझ्या मनात विचार आला की महाराष्ट्रात मुला-मुलींना संगणकावर प्रोग्रॅमिंग शिकण्यासाठी अधी ईंग्रजी का मुळी शिकावे लागावे? शाळेत आपण जर एखादी सोपी मराठी प्रोग्रॅमिंग भाषा उपलब्ध केली तर प्रोग्रॅमिंग शिकायला ईंग्रजीची गरज नाहीशी होईल, मराठी भाषेचे महत्त्व वाढेल आणि उद्धारही होईल. उदाहरण म्हणून खालची दोन-तीन वाक्य पहा. तुम्हाला वाटतं का की अशा एखाद्या कंप्यूटर भाषेची गरज आहे?

नाव := "योगायोग" (assignment)
जर नाव.लांबी() > १० (if statement)
म्हण "नमस्कार" + नाव (print statement)
दर नाव मधील अ घेऊन (for loop)
म्हण "अक्षर" + अ

About Me

My photo
अमरावती - पुणे, महाराष्ट्र, India
इथे तुम्हाला मराठी माणसाच्या जीवणातील विनोद, प्रेम, स्वभाव, राग, आनंद, द्वेष आणि अशी अनेक रुपे कवितेच्या माध्यमातून वाचायला मिळतील. या इंटरनेट आणि इंग्रजीच्या युगात आपली माय-मराठी व तिचे साहित्य कुठे मागे पडायला नको, त्याच्या साठीच हा एक प्रयत्न...
ह्या विभागात वापरण्यात आलेल्या साहित्याचे सर्व हक्क त्या-त्या प्रकाशकाचे किंवा साहित्यकाराचेच. आणि हो कविता आवडल्यास तुमच्या प्रतिक्रीया लिहायला विसरु नका.

Chat with me

Local Time

Live Traffic Feed