तिने विश्वासघात केला म्हणून त्याने तिचे न्यूड एमएमएस नेटवर पसरवले. रिलेशनशिपमधला टेक्नॉलॉजीचा हाविकृत वापर नव्या 'देव-डीं'चं कल्चर बनतोय. गेल्याच आठवड्यातली दिल्लीतली गोष्ट. प्रेयसी आणि प्रियकरयांच्यात नेहमीसारखा बेबनाव झाला. पण त्यानंतर घडलं ते नेहमीचं नव्हतं. त्याने तिचे न्यूड एमएमएस मेलकेले. तेही तिच्याच ईमेल अकाऊण्टवरून. ती नॉएडामधल्या बिझनेस स्कूलमधे शिकणारी. उच्च मध्यम वर्गातली. तोही त्याच वर्गातला. त्यामुळे इंग्रजी पेपरांमधे आणि वेगवेगळ्या ब्लॉगवर या प्रकरणाची खूप चर्चा झाली. सूडघेण्यासाठी टेक्नोलॉजीचा वापर तसा नवा नाही. सध्या, हे प्रकार नव्या पिढीचं 'कल्चर' बनतायत, असंम्हणण्याइतपत वाढत आहेत. प्रेमातलं अपयश पचवता आलं नाही म्हणून दाढीची खुंटं वाढवून कुढत आयुष्यकाढणाऱ्या प्रियकरांचा जमाना कधीच इतिहासजमा झाला. हा जमाना 'देवदास'चा नाही, 'देव-डीं'चा आहे. त्यासाठीते प्रगत टेक्नॉलॉजीचा भयंकर उपयोग करताहेत, हे धक्कादायक आहे.
प्रेम जितकं जुनं तितकाच प्रेमभंगही जुना. पूवीर् प्रेम हळुवार होतं. आता ते फारच प्रॅक्टिकल झालंय. तू नही तोऔर सही, असं म्हणणाऱ्या आशिकांचा हा जमाना. त्यामुळे प्रेयसीने टांग दिली, की कोणी फार काळ आसवं गाळतबसत नाही. दुसरी मुलगी आणि दुसरं प्रेमप्रकरण लगेचच सुरू होतं. नव्या जमान्याचे प्रेमवीर टेक्नो सॅव्ही आहेत. पूवीर्च्या पेमपत्रांची जागा हल्ली एमएमएस आणि मेलने घेतलीय. गर्लफ्रेण्ड-बॉयफ्रेण्डचा फोटो मोबाइल स्क्रीनवरदिसू लागलाय. मोबाइल आणि इण्टरनेटशिवाय प्रेम फुलणं सध्या कठीण झालंय. प्रेमभंग झाल्यावर ब्लॅकमेलवगैरेचे प्रकार पूवीर् विरळ होते. कायद्याची थोडीफार तरी भीती होती. प्रेयसीची जपून ठेवलेली पत्रं आणि फोटोदाखवून ब्लॅकमेल करण्याची एखाद दुसरी घटना घडायची. एमएमएस ब्लॅकमेलिंग हे त्याचं आधुनिक रूप. पूवीर्च्या तुलनेत त्याचं प्रमाण वाढलंय. इतकं की ते रोखायचं कसं, या विचाराने समाजधुरीणांची झोप उडाली आहे.
हल्ली मुलं लहानपणापासून टेक्नो सॅव्ही असतात. वयाच्या पाचव्या वषीर् हाती माऊस येतो. टीवीवरलहानपणापासूनच सेक्स आणि क्राइमचे धडे घेत ही मुलं मोठी होतात. तारुण्याच्या उंबरठ्यावर शरीरात निर्माणझालेली प्रचंड ऊर्जा जिरवण्यासाठी पूवीर् मैदानं होती. शाळा कॉलेजातून आल्यावर मैदानात भरपूर खेळायचं, घरीयेऊन अभ्यास करायचा, रात्री जेवल्यानंतर टीवी पाहायचा किंवा मित्रांसोबत टाइमपास करायचा, असं शेड्युलअसायचं. पण हल्ली स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सवाल्यांनी मैदानं बळकावल्यापासून मुलांना टीवी आणि इण्टरनेटशिवायदुसरा टाइमपास नाही. त्यामुळे हे प्रकार वाढतायत. दिल्लीसारख्या शहरात हे प्रकार धोकादायक पातळीपर्यंतवाढलेत. एका शाळकरी मुलाने आपल्या क्लास टीचरवरचा राग काढण्यासाठी तिचा चेहरा न्यूड फोटोवर जोडून तोपॉर्न वेबसाइटवर टाकला. अभिनेता अश्मित पटेलने बनवलेला अभिनेत्री रिया सेनचा न्यूड एमएमएस असाचजगभर गाजला. सूड उगवण्यासाठी टेक्नोलॉजीचा वापर करण्याची वृत्ती अचानक तरुणपणी निर्माण होत नाही. बालपणीच ती मनात रुजते. अशाच दिल्लीच्या एका कुमारवयीन ग्रुपने अश्लील एमएमएस तयार करून तो बाजीडॉट कॉमवर विकायला ठेवला होता. मोबाइलवरून शाळकरी पोरं आणि कॉलेजचे तरुण एमएमएस पाठवतात, पण१४ वर्षांच्या पोरांच्या आणि नुकतंच मिसरुड फुटलेल्या तरुणांच्या हाती हे मोबाइल देतं कोणं? नवी पिढी जेनकळत करते तेच मागची पिढी सराईतपणे करताना दिसते. महिला कर्मचाऱ्यांना बॉसकडून मिळालेले अश्लीलएसएमएस हे त्यातलंच एक उदाहरण. यामुळे टेक्नोलॉजीचा हा 'सदुपयोग' अजाणत्या वयातच घडतोय, असंहीम्हणायला वाव नाही.
Saturday, June 09, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
हेच ते, टेक्नॊलॊजीचा घाणेरडा वापर. आणि हे ’देव-डी’ प्रकार तर आपण वीस-बावीस वर्षांपूर्वीच पाहिले की. भर परिक्षेत पेट्रोल ओतून जाळली गेलेली... आठवले तरी काटा येतो अंगावर.
मैदानी खेळ लहान मुलांनी खेळावेत ह्यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न केला पाहीजे. तुम्ही म्हणता हे सत्यच आहे, जुन्या पिढीने जाणतेपणाने केलेल्या गोष्टी आता नवी पिढीही करते आहे. फार फार त्रास होतो हे सगळे पाहून.
चांगले मांडलेत, धन्यवाद.
Post a Comment