काय म्हणता काळ बदलला
पूर्वीचा काळ सुखाचा
आता नाही कोण कुणाचा
तोच प्रवास, तोच रस्ता
वीट आलाय या जीवनाचा
मान्य आहे इंधन महागल्य
पण कधी पहाटे लवकर उठून
घन:श्याम सुंदरा ऐकल्य?
ते राहुद्या, सूर्योदयाच मनोहर रूप
शेवटाच केंव्हा पहिलाय ?
मान्य आहे तुम्ही खूप धावपळ करता,
एकाच वेळी अनेक ठिकाणी असता
पण पहिलाय कधी पोर्णिमेचा चंद्र
कोजागिरी वगळता?
तृण मखमलीवर आकाश पांघरूण
मोजळ्यात कधी चांदण्या रात्र सरता
मान्य आहे पौलवत्ांचे हमरस्ते झालेत
मनाचे कप्पे अरुंध झालेत.
जरी करीत असाल तुम्ही इंटरनेटवर हजारो मित्र
पाठवीत ही असाल ढिगाणी ईमेल आणि चीत्र
पण कुणाला पाठवलाय कधी एखाद
50 पैशाच आंत्रदेशीय पत्र?
आणि लुटलाय का कधी पोस्टमन कडून
शुभेच्छा तार स्वीकार्ल्याचा आनंद?
मान्य आहे, जीवनमान बदलल्य,
पालटलाय साराच नूर
आम्हालाही पडते आजकाल
डीजे पार्त्यांची भूल
पण ऐकलाय का हो कधी
रेडिओवर 11 चा बेला के फूल?
मला नाही कळट अस काय झाल्य
की ज्याने आपल सार वीश्वच बदललाय
सूर्य नाही बदलला, चंद्र ही नाही बदलला
काळ आहे तिथेच आहे तो नाही बदलला
तुमचा आमचा पाहण्याचा नजरीया बदलला.
Wednesday, October 24, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
Really good use of words,haven't seen you writing since 2007, why dont you write something.
Post a Comment