Tuesday, June 09, 2009

माझ्या कवितेच्या वहीत

माझ्या कवितेच्या वहीत
रंगा गंधांची उधळण
काळोखाच्या पानोपानी
शुभ्र चांदण्याची पखरण...

माझ्या कवितेच्या वहीत
अर्थ शब्दांचे उलगडे
कधी हरवलेला चेहरा
माझा मलाच सापडे...

माझ्या कवितेच्या वहीत
माझे जगण्याचे बळ
वाळवंटी वाटेवर जणू
गर्द सावलीचे स्थळ

माझ्या कवितेच्या वहीत
अजून असे बरेच काही
जे शब्दापल्याडचे
शब्दात मावत नाही...

संदीप वाकोडे
सिरसो विभाग
मूर्तिजापूर, जि. अकोला

No comments:

About Me

My photo
अमरावती - पुणे, महाराष्ट्र, India
इथे तुम्हाला मराठी माणसाच्या जीवणातील विनोद, प्रेम, स्वभाव, राग, आनंद, द्वेष आणि अशी अनेक रुपे कवितेच्या माध्यमातून वाचायला मिळतील. या इंटरनेट आणि इंग्रजीच्या युगात आपली माय-मराठी व तिचे साहित्य कुठे मागे पडायला नको, त्याच्या साठीच हा एक प्रयत्न...
ह्या विभागात वापरण्यात आलेल्या साहित्याचे सर्व हक्क त्या-त्या प्रकाशकाचे किंवा साहित्यकाराचेच. आणि हो कविता आवडल्यास तुमच्या प्रतिक्रीया लिहायला विसरु नका.

Chat with me

Local Time

Live Traffic Feed