Thursday, June 11, 2009

नव्या उमेदीने जग...

जग, तू नव्या उमेदीने राखेतून जगण्यासाठी उठल्याप्रमाणे, बघ प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीकोणातून. श्रावण असेल तर हिरवळीवर मनसोक्त लोळ अन्‌ शिशिरात पिकलं पान पडलं तर त्याला सोन्याप्रमाणे तोल. भेटला झरा सुखाचा तर समजून हा जिवनातील आनंद पण, झाला दगा आयुष्यात तर घे तो ही अनुभव आयुष्याचा. प्रत्येक क्षण वेचून हो अमृत म्हणून आयुष्य जगतांना फक्त नावालाच जिवंत राहू नकोस. वाईट गोष्टी, अनुभव लवकर विसरून जा. चांगल्या गोष्टी, अनुभव नेहमीच लक्षात ठेव कारण तेच भावी आयुष्यातील स्फुर्तीच उगमस्थान असेल, कोणी तुझं वाईट केलचं तर त्याचा राग द्वेष मनात कधीच ठेवू नकोस कारण द्वेषापेक्षा प्रेम करणे सोपं असतं तेव्हा त्यांच्यावरही प्रेमच कर कारण प्रेमानेच प्रेम वाढतं, कारण प्रेमासाठी आयुष्य कमी पडतं, तेव्हा कधीही प्रेमान भरलं मन तोडू नकोस कारण त्या मनामध्ये देव राहात असतो असं म्हणतात.
झालास यशस्वी जीवनात तर त्याचा आनंद घेतल्याशिवाय राहू नये पण आलं अपयश तर निराशही होऊ नकोस. मी सांगणार नाही तुला अपयश ही यशाची पहिली पायरी असते वगैरे. पण एवढं मात्र नक्की अपयश म्हणजे संपूर्ण जीवन नसते, लागतच नसेल कशात मन तर वाचून हो सुरुवातीला अपयशी झालेल्या यशस्वी व्यक्तींच्या कारकिर्दिची पुस्तक, मानते मी त्यातील सर्वच काही खरं नसते. पण त्यातील अपयशाकडून यशाकडे जाण्याचे मनोधैर्य तेवढं घ्यायचं असते, कर प्रेम सर्वांवर चांगल्यावर वाईटवर, वाईट लोकांवर जरा जास्तच कर कारण त्यांनाच खरं तर प्रेमाची आवश्यकता असते. आयुष्यात काहीच मिळालं नाही म्हणून कधी दुःख करू नकोस कारण ज्या गोष्टी मिळविण्यासाठी लोकांना आयुष्य घालवावे लागते त्या कदाचित आपल्याला जन्मताच न मागता मिळाल्या असतात तेव्हा त्यांचा उपभोग घे.
स्वतःला नशीबवान म्हणूनच जगात वावर कारण जो स्वतःला नशिबवान समजते तोच व्यक्ती आयुष्यात समोर जातो. नशीबात जे असतं ते घडते हे खरं पण सर्वच नशीबावर न सोडता त्याला मेहनतीची साथ दे. या जगात काहीच अशक्य नाही जे घडून गेले त्यावर कधी खंत व्यक्त करू नकोस त्यापेक्षा जे पुढे होणार आहे त्यावर लक्ष केंद्रीत कर.
स्वतःला मोठं दाखविण्याकरिता दुसर्‍या व्यक्तीस कमी माननेच आवश्यक नाही स्वतःमध्ये असे गुण बाळग की ज्यामुळे स्वतःच्या व इतरांच्या नजरेत मोठा होशील तुझ्याजवळ स्वाभिमान असू दे पण अभिमान मात्र कधी होऊ देऊ नको. कारण स्वाभीमान आणि अभिमान फार थोडेच अंतर आहे याच अंतराला तूला नेहमी कायम ठेवायचे आहे.

1 comment:

Unknown said...

i like it very much

About Me

My photo
अमरावती - पुणे, महाराष्ट्र, India
इथे तुम्हाला मराठी माणसाच्या जीवणातील विनोद, प्रेम, स्वभाव, राग, आनंद, द्वेष आणि अशी अनेक रुपे कवितेच्या माध्यमातून वाचायला मिळतील. या इंटरनेट आणि इंग्रजीच्या युगात आपली माय-मराठी व तिचे साहित्य कुठे मागे पडायला नको, त्याच्या साठीच हा एक प्रयत्न...
ह्या विभागात वापरण्यात आलेल्या साहित्याचे सर्व हक्क त्या-त्या प्रकाशकाचे किंवा साहित्यकाराचेच. आणि हो कविता आवडल्यास तुमच्या प्रतिक्रीया लिहायला विसरु नका.

Chat with me

Local Time

Live Traffic Feed